in

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकार ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी ४१ तालुक्यात 82 वसतिगृहे उभारणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० तालुक्यात २० वसतिगृहे उभारणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ही वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात या योजनेबाबत घोषणा केली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आणि सर्वानुमते ठरावाला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”अशोक चव्हाणांनी गडकरींसारख काम करून दाखवावे”, देवेंद्र फडणवीसांचा शाब्दिक चिमटा

‘मातोश्री’चं आमंत्रण आम्ही स्वीकारलं