in

Mumbai Local; मुंबई लोकल सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार ? विजय वडेट्टीवार म्हणाले…

महाराष्ट्रातील कोरोनाचा आलेख उतरता पाहत आता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या सर्वात आता मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुली होणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.

विजय वड्डेटीवार म्हणाले, राज्यात ५ टप्प्यांनुसार अनलॉक करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदुरबार जिल्हे येतात. या जिल्ह्यात निर्बंध अंशत शिथिल होणार आहेत.

गेल्या तब्बल वर्षभराहून अधिक काळ सर्व सामान्यांच्या प्रवासासाठी बंद असलेल्या लोकल बाबत वड्डेटीवार म्हणाले, मुंबईला सध्या लोकल ट्रेन बंद असणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांची निराशा झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

TET Certificate| टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

Maharashtra Unlock : जाणून घेऊयात कोणते जिल्हे झालेत अनलॉक ? काय बंद आणि काय सुरू राहणार