in

समीर वानखेडेंना मुंबई पोलिस पाठवणार समन्स

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी 11 ऑक्टोबर रोजी माझी पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसात याबाबत तक्रारदेखील केली होती. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स पाठवणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल परवडत नाही, 80 लाखांची गाडी कशावर चालणार; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

अहमदनगर जिल्ह्यात नव्या 318 कोरोनाबाधितांची भर