in

Mumbai Rains | ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत, तर रस्ते वाहतूक धीम्या गतीनं

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई-विरार आणि पालघरमध्ये देखील सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

मुंबईची लाईफलाईन सुरळीत

मुंबईत संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. तर सध्या ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल स्टेशनवर थांबून आहेत. मुंबईकडे जाणारे ट्रॅक पाण्याखाली आहेत. पातळी वाढते त्यामुळे लोकल वाहतूक बंद झाली आहे. जर असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे आणि हार्बर या मार्गावरची लोकलसेवाही ठप्प होऊ शकतो.

रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरु

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतली नाहीये. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत अनेक भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 तास मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon Update | कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Neha Dhupia | नेहा धूपिया होणार दुसऱ्यांदा आई