in

Mumbai Rains Updates| वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पुन्हा सुरू झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेची अनेक स्थानके पाण्याखाली गेली आहेत. अशातच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ३ ते ४ किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात दहिसर टोल नाका जाम झाला आहे. पावसाचा फटका वाहनांना झालेला पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pegasus Spying | 40 हून अधिक पत्रकारांवर हेरगिरीचा दावा

नाशिकनंतर आता राज ठाकरे पुण्यात