in

Dharavi Corona ; धारावीत सापडला आज फक्त कोरोनाचा एकच रुग्ण!

मुंबईत कोरोनाचा संसर्ग खालावत चालल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून आले. त्यात सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा आहे.

कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसारख्या भागात फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 19 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे.

धारावीत आजवर एकूण 6829 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9466 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 17 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9802 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Unlock; महाराष्ट्र अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेते कडाडले…

बदलापूरात गॅस गळती; नागरिकांच्या प्रकृतीची चिंता वाढली