in ,

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्या सामूहिक रजा घेणार त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. नायर रुग्णालयात कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांच्या खाटा जबरदस्तीने रिकाम्या करुन, कोविड पेशंटची व्यवस्था केली जातेय. अप्रशिक्षित डाँक्टरांवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी दबाव टाकला जातोय.

मागील काही तासांपासून नायरच्या अधिष्ठातांसोबत डाँक्टरांची बैठक सुरू होती. मागण्या मान्य न झाल्याने नायरमधील डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नायरमध्ये किडनीचा आजार असलेल्या रुग्णांवर डायलसिस केले जाते. त्याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांवर केमोथेरपीनेही उपचार केले जातात.

पण सध्या अन्य आजारांपेक्षा कोरोनाबाधितांवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीने नायर रुग्णालयात तयारी सुरु आहे. पण हा निर्णय घेताना, डॉक्टरांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे. मार्डचे हे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमित शाह यांची छत्तीसगडमध्ये जाऊन जवानांना श्रद्धांजली

Anil Deshmukh Resigns: मविआची दुसरी विकेट… गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा