in

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचंय”, पटोलेंच्या निशाण्यावर ‘मोदी-शाह’

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस कंबर कसत असल्याचं चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाषणांमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे”, असं पटोलेंनी म्हटलंय. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल”

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…ही वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”