प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच किमान समान कार्यक्रम आणि महामंडळ वाटपाबाबत देखील चर्चा होणार असल्याचे समोर आले. मात्र कोरोना परिस्थिती संदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
Comments
Loading…