in

‘फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा’

महाराष्ट्रात सध्या कोरोना महामारीचं मोठं संकट आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारवर टीका केली होती. याच धर्तीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला. परंतु केंद्रातील मोदी सरकारनं महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवं होतं’, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपचे नेते मात्र राज्य सरकारविरोधात कटकारस्थाने करीत राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली, असा आरोपही पटोले यांनी केला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

औरंगाबाद जिल्ह्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ