in

“राज्यात गरज असताना केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय”

राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढतोय. अशा वेळी १८ वर्षांवरील तरुणांना सरसकट लस देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

करोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात. त्यामुळे करोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. यामुळे त्यांचे लसीकरण करण्याची मागणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा होण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राला लशींची आवश्यकता असतानाही केंद्र सरकार मात्र पाकिस्तानला लस पुरवठा करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmer Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…