in

”मागच्या सरकारमध्येही सुपरमंत्री होते”, नाना पटोलेंचे फडणविसांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी गुरुवारी राज्य अनलॉक करण्यासंदर्भातल्या केलेल्या विधानानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची चांगलीच टेर उडवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आज थेट राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री असल्याची जळजळीत टीकाच केली होती. या टीकेवर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, विजय वड्डेटीवार त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना वाटत की अनलॉक होऊ शकत त्यामुळे त्यांनी राज्य अनलॉक करण्याची घोषणा केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना कदाचित अनलॉकच्या नियमात काही बदल अपेक्षित होता. म्हणून या निर्णयात काहीसा बदल करून आम्ही जाहीर करणार असल्याची सारवासार्व त्यांनी केली. तसेच अनलॉकचा निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. तसेच आता जी एसओपी निघेल ती व्यवस्थित निघेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान मागच्या सरकारचा कारभारही आपण पाहीलात, त्यांच्यामध्ये सुद्धा सुपरमंत्री होते, असे प्रत्युतर नाना पटोले यांनी फडणवीसांना दिले. तसेच सरकारमध्ये कोणतीही गडबड नाही.सार काही आलबेल आहे, सरकार समन्वयाने सुरू आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यापुढे लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी ममतांचा फोटो?

अनलॉकबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील – अजित पवार