in

पावसामुळे नांदेड ते मुंबई जाणारी रेल्वे रद्द

नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात होणाऱ्या धुवांधार व मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून चालू असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले. दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. नांदेड ते छत्रपती टर्मिनस मुंबई जाणारी रेल्वे गाडी क्र-07617, मुंबई नांदेड तपोवन स्पेशल रेल्वे गाडी क्र-07612, मुंबई नांदेड राजराणी स्पेशल रेल्वे गाड्या आज घडीला रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना ते छत्रपती टर्मिनस मुंबई जाणारी रेल्वे गाडी क्र-02272, तसेच मुंबई व्हाया जालना जाणारी जनशताब्दी स्पेशल रेल्वे गाडी क्र-02271 ह्या आज दि-22-07-21 रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत

हीना पांचाळला अखेर जामीन मंजूर …