in

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा – नारायण राणे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

या प्रकरणावर नारायण राणे पत्रकार परिषद घेतली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्राला काळीमा फासणारे कारनामे सरकारनं केले असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. परमबीर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे. परमबीर यांनी फक्त गृहमंत्र्यांवर नाही तर ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत, असंही राणे यांनी म्हटलं आहे. वाझेंना मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात आणलं, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है’, भाजपाचं गृहमंत्र्यांविरुद्ध आंदोलन

राज ठाकरे | गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ; केंद्राकडे केली चौकशी मागणी