in

‘लोक मरतात हे उद्धव ठाकरेंचे पाप’ – नारायण राणे

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंना राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ठाकरे सरकार फासवाफसवी करतयं अशी टीका नारायण राणे यांनी केली. राज्यामध्ये संचारबंदी तर आहे पण संचारबंदीला कोणताही परिणाम दिसला नाही. त्यामुळे कोरोना वाढतोय हे सरकारचं अपयश आहे. कोरोनाकाळातही सरकारने भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे भ्रष्टाचार हाच ठाकरे सरकारचा एककलमी धंदा आहे ,अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

यावेळी महाराष्ट्राचे अर्थकारण मुख्यमंत्र्यांना काळात नाही असे देखील ते यावेळी म्हणाले. संचारबंदीमुळे अनेकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन उठावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्यात कायदा सुव्यावस्था नाही तर लोक मरतात हे उद्धव ठाकरेंचे पाप आहे , उद्धव ठाकरे जनतेला वाचवू शकत नाही, असं राणेंनी म्हटलंय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरची पळवापळवी

Indian Railway | स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेची मोठी घोषणा