in

नाशकात लवकरच शाळेची घंटा वाजणार, छगन भुजबळांनी सांगितली तारीख

नाशिक – येत्या सोमवारपासून (१९ जुलै) जिल्ह्यातील काही ठिकाणी शाळा सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
यामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार असून कोरोनामुक्त झालेल्या ३३५ गावातील २९६ शाळांना वर्ग भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

नाशिकच्या ग्रामीण भागात १ हजार २४ शाळा आहेत. त्याच्यापैकी ३३५ शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये मालेगाव ४७, नांदगाव ३१, ग्रामीण नाशिक १६, इगतपुरी ३०, सिन्नर १३, त्र्यंबकेश्वर ७, येवला ३४ यांसोबत अन्य काही भागांचा समावेश आहे. ‘एका बेंच वर एक विद्यार्थी’ या पद्धतीने संपूर्ण शिक्षण प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास संपूर्ण शाळा बंद करण्यात येईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. त्याअंतर्गत कोरोनामुक्त झालेल्या गावातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत नाशिकमध्ये देखील पुन्हा एकदा वर्ग गजबजणार आहेत. मात्र कोरोनाचे नियम पाळून या शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई ४० किलो गांजा जप्त

रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिलेचे दागिने वाचले