६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (67th National Film Awards) घोषणा झाली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूडची कॉन्ट्रॉवर्सी क्वीन कंगना रनौतला पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटाकरता सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगनाला जाहीर झाला आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मिळायला या गिफ्टमुळे कंगना देखील खुश झाली आहे.
तर ‘भोंसले’ चित्रपटाकरता मनोज वाजपेयी आणि ‘असुरन’ या तमिळ चित्रपटाकरता धनुष या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
Comments
Loading…