in ,

पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर ? भाजप नेत्याचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणाची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होण्याची शक्यता भाजपने व्यक्त केली आहे.

शरद पवार आज दुसऱ्यांदा पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान या वृत्तानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी पवारांच्या पोटदुखीच सबंध सचिन वाझेंसोबत केला. “सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट त्यांनी केले.

नवीन जिंदल पुढे म्हणाले, “पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय” असंही ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ ८ राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

West Bengal Assembly Elections 2021; माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर जीवघेणा हल्ला