in

महिलांचे लसीकरण करून नवरात्रोत्सव साजरा करा

भारत गोरेगावकर, रायगड | यंदाचा नवरात्रोत्सव लसीकरणाने साजरा करण्याचे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. 11 ऑक्टोबर हा दिवस रायगड जिल्‍हयातील फक्त महिलांसाठी लसीकरण डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.

देशभरात नवरात्रोत्सव सुरू झाला आहे या उत्सवात विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्साहित असतात कोरोना महामारीचे संकट पुर्ण पणे टळले नसल्याने खबरदारी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे याच भावनेने यंदाचा नवरात्रोत्सव लसीकरणाने साजरा करण्याचे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिति तटकरे यांनी केले असून 11 ऑक्टोबर हा दिवस रायगड जिल्‍हयातील फक्त महिलांसाठी लसीकरण डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह जिल्‍हयातील सर्व भागात केवळ महिलांसाठी दिवसभर लसीकरण उपलब्ध करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून या अभिनव उपक्रमात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात; पवारांचा अप्रत्यक्षपणे मोदींना टोला

महाडमधील नव्या पोलीस वसाहतीचे अखेर लोकार्पण…