in

ड्रग्ज प्रकरण : भाजपा नेत्यांच्या आदेशावरून ३ आरोपींना एनसीबीनं सोडलं; नवाब मलिकांचा गंभीर दावा

कॉर्डिला क्रूज ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर दावा केला आहे. प्रतिक गाभा, आमिर फर्निचरवाला, ऋषभ सचदेवा हे तिन्ही व्यक्ती त्या क्रूजवर उपस्थित होते. त्यांनी आर्यनला क्रूझवर आणलं. त्या जहाजावरून ११ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, त्यापैकी तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडलं याचं उत्तर एनसीबीनं द्यावं, असं मलिक म्हणाले आहेत.

ऋषभ सचदेवा हा भाजपा युवामोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे, असा दावादेखील मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा भंडाफोड केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही व्हिडिओ दाखवला असून त्यात हे तिन्ही आरोपी एनसीबी कार्यालयाच्या बाहेर पडताना दिसत आहेत.

मलिक यांचे एनसीबीला सवाल –
ताब्यात घेतल्यानंतर २ तासांत सोडण्यात का आलं? १३०० लोकांच्या जहाजावर रेड केली. १२ तास तुमचा छापा चालला. त्यात तुम्ही ११ लोकांना ताब्यात घेतलं. सगळ्यांना कार्यालयात आणलं. या तिघांना सोडण्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले हे एनसीबीनं सांगावं?, असं मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंची भाजपा नेत्यांशी फोनवरून बातचीत –

छापेमारी पूर्णपणे बनावट होती. प्री प्लान कार्यक्रम आहे. वानखेडेंनी दिल्ली आणि राज्यातील भाजापाच्या नेत्यांशी बातचीत झाली आहे. त्यांचं कॉल रेकॉर्ड समोर यावं. एनसीबीनं याचा खुलासा करावा, अशी मागणीही नवाब मलिकांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरेत आज पुन्हा बिबट्याचा हल्ला !

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या समर्थनार्थ रास्ता रोको