in

“शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर”

एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा चव्हाट्यावर आली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलंय.

शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक राजकीय चर्चांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं. अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

“माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे, असे विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ८ हजार ९५० रूग्ण कोरोनामुक्त

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात