in

शरद पवार तातडीनं दिल्लीत; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारदिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे यांची दिल्ली भेट, नंतर शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र, या पार्श्वभूमीवर पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

InternationalYogaDay | योग करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही?

लसीकरणाबाबत केंद्राकडून योग्य नियोजन झाले असते,तर…; हसन मुश्रीफ