in

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

प्रशांत जव्हेरी | उत्तर प्रदेशतील लखिमपुर खोरी दुर्घटनेचे निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलन करण्यात आलं. लखिमपुर येथील शेतकर्‍यांकडून सुरू असलेले आंदोलनाचा वर एका व्यक्तीने गाडी घालून अनेक लोकांच्या मृत्यू झाला होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या निषेधार्थ आज महा विकास आघाडीकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे.

या हाकेला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला असून त्यासाठी राष्ट्रवादीकडून अनोखा आंदोलन करण्यात आला हात जोडून व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याचा विनंती करत घटनेच्या निषेध केला आहे. यावेळी कोरोना चे नियम पाळून मोजकेच कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. या घटनेच्या जे कोणी दोषी असतील त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र बंददरम्यान शिवसैनिकांकडून रास्ता रोको

नैतिकता असेल तर शेतकऱ्यांना पॅकेज घोषित करा – देवेंद्र फडणवीस