in

Neha Dhupia | नेहा धूपिया होणार दुसऱ्यांदा आई

नेहा धूपियाने पुन्हा दिली गुड न्यूज दिली आहे. नेहाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. नेहाने पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा आणि अंगद अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.

नेहाने दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची गूड न्यूज इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत दिली आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘या फोटोला काय कॅप्शन द्यायचे हा विचार करण्यात दोन महिने गेले… आम्ही विचार केलेले सर्वात चांगले कॅप्शन म्हणजे.. देवा तुझे आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १० मे २०१८मध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केले. नेहाने प्रेग्नंट असल्यामुळे अंगदशी लग्न केल्याचे म्हटले जात होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rains | ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत, तर रस्ते वाहतूक धीम्या गतीनं

विक्की कौशलचा ‘हा’ video viral