in

बिबवेवाडीत घबराहट; शुल्लक कारणावरून शेजाऱ्याने घेतला एकाचा बळी

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यात बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग-2 मध्ये चालू असलेल्या बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात शेजाऱ्याने रागाच्या भरात दोघांवर वार करून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कदायक घटना सोमवारी घडला.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये इंदिरानगर चौकातील आम्रपाली पेट्रोल पंपाजवळील राजीव गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील पार्किंगमध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईकामी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली उडून घबराटीचे वातावरण निर्माण झाले झाले होते. शरद सीताराम पुरी असे मयत झालेल्या शेजारील तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपत्कर याला अटक केली आहे. तर मिळालेल्या माहितीच्या आधारे विशाल भिमराव ओव्हाळ (वय 26, रा.पद्मावती वसाहत सहकार नगर पुणे) असे बेवारस मृतदेहांचे नाव आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“…याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे” शिवसेनेची टीका

राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रातील बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह