in

SP अशोक दुधेंची धाडसी कामगिरी : ३०हून अधिक गायी, म्हशींना वाचवलं

कत्तलीसाठी जमा करण्यात आलेल्या ३०पेक्षा अधिक जनावरांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यात गायी आणि म्हशींचा समावेश आहे. आज पहाटेच्या सुमारास रायगडचे एसपी अशोक दुधे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याठिकाणच्या संपूर्ण गायी आणि म्हशींची सुखरूप सुटका केली. यानंतर एसपी अशोक दुधे यांच्या धाडसी कारवाईचं सर्वस्तरातून मोठं कौतुक केलं जात आहे.

एसपी अशोक दुधे

दरम्यान, दुधे यांना या संपूर्ण घटनेची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी टीमसह तत्काळ पावलं उचलत कैद करून ठेवण्यात आलेल्या गायी आणि म्हशींचा शोध लावला. त्यानंतर दुधे यांच्या नेतृत्वाखाली सुखरुपरित्या सर्व गायी आणि म्हशींची सुटका केली. एसपी अशोक दुधे यांच्या कामगिरीचं सध्या कौतुक होत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगावात भाजपाची गळती सुरूच… आणखी पाच नगरसेवकांच्या हाती ‘शिवबंधन’

कर्जबुडव्या मेहुल चोक्सीचे कस्टडीतील फोटो आले समोर