in

‘नगरसेवक आमचे न महापौर तुमचा’; गिरीश महाजनांना नेटकऱ्यांचा सवाल

भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. 27 नगरसेवक फोडून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. या पराभवानंतर गिरीश महाजन यांच्यावर विविध पोस्टरच्या माध्यमातून तसेच स्टेटस च्या माध्यमातून होत असलेल्या कॉमेंट्सची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अस कुठे असतय, नगरसेवक आमचे न महापौर तुमचा असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

लोकांना शिवसेनेची सत्ता आल्या पेक्षा भाजपची सत्ता गेल्याने जास्त आनंद होत आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्‍चित केलं. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

What do you think?

-40 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

भारताचा 8 धावांनी विजय