in

New indian labor law | देशात नवीन कामगार कायदे येणार.. भत्ते व सवलतींमध्ये मोठे बदल

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार नवे चार कामगार कायदे लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कायद्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार करत असून लवकरच ते लागू होऊ शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार कमी होणार असून त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वाढणार आहे.

या नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे समीकरण बदलणार आहे. कोरोना संकट काळात अनेक कामगारांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून पीएफची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागतोय. लाॅकडाउनचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गाला बसल्याने आर्थिकदृष्ट्या त्यांना उभं करण हे सरकार समोर मोठ आव्हाहन असणार आहे. नवीन कामगार कायदा कामगारांसाठी खरंच कितपत फायदेशीर ठरतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत अल्पवयीन मुलीचा एकाच रात्रीत तिघांनी केला गँगरेप… इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

Tokyo Olympic | ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूला मिळणार १४ ‘कंडोम’