मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
या प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे की, वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत आणि व्हाट्सअॅप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे.परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
Comments
Loading…