in

नवनियुक्त आयुक्त अनिल पवार यांनी स्विकारला पदभार

संदिप गायकवाड | वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर आज अनिल पवार यांनी आज वसई विरार महापालिकेचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.

वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी गंगाधरन डी होते.त्यांची बदली मंत्रालयात झाल्या नंतर त्यांच्या जागी आता वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी या संदर्भातला आदेस काढला आहे.

वसई विरार महापालिकेचा नवनियुक्त आयुक्त अनिल पवार यांनी पदभार स्विकारताच आज पत्रकारांशी संवाद साधून शहरा विषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना आणि ओमियाक्रोनची आलेली तिसरी लाटेला अटकाव लावणे हे सर्वाधिक आवाहन असेल असे यावेळी अनिल पवार म्हणाले. दुसरा डोस आणि बूस्टर डोस तसेच 15 ते 18 वर्षामधील मुलं, मुली, विध्यार्थी यांना पहिला डोस देण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व अधिकारी यांची बैठक घेऊन, शहरातील सर्व समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवे आयुक्त अनिल पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान आयुक्त गंगाधरन डी यांनी कोवीड काळात महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला होता. यावेळी त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. आता नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार कसा कारभार पाहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Bank Election: प्रविण दरेकरांना मोठा धक्का; मुबै बॅंकेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती

धक्कादायक! सात भारतीय खेळाडू कोरोना पाॅझिटीव्ह