in

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? आज बैठक

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे.

विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरात कोणाच्या हातात असेल याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

‘ही’ नावं चर्चेत –

उपमुख्यमंत्री असलेल्या नितीन पटेल यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याही नावाची चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल आणि गोरधन जडाफिया हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ!

तेलंगणामध्ये आता ड्रोन करणार औषधं आणि लसीचा पुरवठा