in

डॉ.निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका

छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या कर्तबगार, कर्तृत्वान स्ञी ची भूमिका कोण साकारणार याची कामालीची उत्सुकता होती.पण आता ती संपली आहे,जय भवानी जय शिवाजी या मालिकेत अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड साकारणार आहेत, डॉ.निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत.

“अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे.” हे पात्र साकारताना आणि जिजाऊंचं पात्र उभं करण्यासाठी खूप जनांचे कष्ट आहेत. लेखकांपासून दिग्दर्शक, मेकमन पासून वेशभुषेपर्यंत सर्वांची मेहनत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक आलेलं हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की मे देखील या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे.असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

स्टार प्रवाह प्रस्तुत मालीकेची निर्मिती दशमी क्रिएश्न्स ची असून २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्वराज्याच्या शिलेदारांची गोष्ट भेटीला येणार आहे. 

या ऐतिहासिक मालिकेतून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान,बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, नेतोजी पालकरांच्या भूमिकेत कश्यप परुळेकर आणि शिवा काशीद यांच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकरांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | चार दिवसांनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, तर चांदीच्या दरात घट

कोल्हापूरमध्ये तृतीयपंथीयाच्या मृत्यूने खळबळ