in

अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी माऊलीच्या गाण्यावर धरला सूर…

आषाढी एकादशीनिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्र विठूरायाच्या गजरात लीन झाला आहे. या मुहूर्तावरच जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी एका अल्बम सॉंग मध्ये आपला आवाज दिला आहे. ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाणे त्यांनी या अल्बममध्ये गायले असून प्रेक्षक या गाण्याने मंत्रमुग्ध होत आहे.

अभिनेत्री निशिगंधा वाड ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉंग मध्ये दिसणार आहेत.
‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे सॉंग सिटी मराठी या युटूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, दिग्दर्शक अजित पाटील आणि त्यांच्या टीमने अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले असून सध्या सोशल मिडियावर हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस आले. अभिनेते दीपक देऊळकर यांची ही संकल्पना असून संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी हे गाण संगीतबद्ध केले. तर सोनाली चंदात्रे यांनी या गाण्याला सुमधुर असे स्वर दिले आहेत.

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्याच्या निमित्ताने जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी गाण्यासाठी आम्हाला वेळ दिला. त्यांनी गाणे बघितल्यानंतर त्यांची कौतुकाची थाप ही प्रेरणा देणारी असल्याचे अजित पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनमाडमध्ये विठ्ठल मंदिरं सजली, आषाढी एकादशी साजरी

Raj Kundra arrest : राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोल