in

लस तुटवड्यावरून नितीन गडकरींचा केंद्राला सल्ला; म्हणाले…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला आहे. देशांतर्गत कंपन्यांना साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात पुरवठा होऊ करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

चंदनऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल असे गडकरी यांनी सांगितले. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत. याच्या अनेक तक्रारीनंतर गडकरी यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे मांडला. रूग्णालयात ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संपूर्ण जगाचं लसीकरण व्हायला २-३ वर्ष लागतील

देशात कोरोनाबळींचा नवा उच्चांक; २४ तासांत २,६७,३३४ आढळले पॉझिटिव्ह