in

”नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवेत”,काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी रंगत असतेच. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात विधान केले आहे. देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोतल होते. यावेळी त्यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.“मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही” अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होतं. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोल रुममधून परिस्थिती हाताळत आहेत. प्रशासनावर ताण नको म्हणून आम्हीही उशिरा बाहेर पडत आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा ठरला; नुकसानीची माहिती घेणार

रेमडेसिवीर हद्दपार, पुढे काय?