राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताचा आणि बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांच्या सहकार्याशिवाय प्रशासन काहीही करू शकत नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय.
अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आणि बेड उपलब्ध न झाल्यामुळे, या संदर्भात आज बैठक घेतली जाणार आहे. तसेच नागपूर व्यतिरिक्त राज्यात देखील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असून गरज भासल्यास तो अन्य ठिकाणी पुरवला जाऊ शकतो, असे राऊत यांनी सांगितले.
Comments
Loading…