in

‘केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी दिल्लीमध्ये संवाद साधला. विरोधकांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. याच धर्तीवर, आता केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यावेळी अनिल देशमुख हे काही देशातील महत्त्वाचा प्रश्न नसून, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत. ED येऊदे किंवा अजून काही सरकारवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असं म्हणत संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

विरोधकाचे पायंदे यशस्वी होणार नाहीत. देशमुखांवर आरोप प्रत्यारोप होतच राहणार. यासर्व गोष्टींचा सरकारला कोणताही धोका नाही परमबीर यांच्यावर विश्वास ठेवून भाजपचे आरोप करत आहेत. सध्या परमबीरसिंह विरोधकांनाच महत्वाचे हत्यार आहे असे म्हणत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक…

जागतिक पाणी दिनानिमित्त ‘जलशक्ती’ अभियानाची घोषणा