in

आता मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीच लागणार

निवडणुकींच्या काळात नेते मंडळी अनेक आश्वासने देतात. निवडणूक झाल्या नंतर मात्र त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. मात्र आता यापुढे असे होणार नाही असाच एक निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीच लागणार आहेत.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आजपर्यंत दिल्लीत अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे “दिल्ली सरकार अशा सर्व गरीब भाडेकरूंचं भाडं सरकारी तिजोरीतून भरेल, ज्यांना ते भरता येणं शक्य नाही” असं जाहीर आश्वासन दिलं होतं.

मात्र, आश्वासनानंतर एक वर्षाहून जास्त काळ लोटून देखील त्यावर प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने आज त्यासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळावंच लागेल, असे निर्देश दिले आहेत.

हा निकाल जरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या नागरिकांच्या संदर्भातला असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा

हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडले; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन