in ,

राज्यात नवीन रुग्णांचा आकडा जैसे थेच; मृतांचा आकडा वाढला

राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र आज मृतांच्या संख्येचा आकडाही वाढला आहे. आज तब्बल 132 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मृतांची संख्या वाढताना दिसत आहे.त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात आज एकूण 2 लाख 30 हजार 641ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 28 हजार 699 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 25 लाख 33 हजार 026 वर पोहोचला आहे.गेल्या 24 तासांत राज्यात 132 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 53 हजार 589 वर पोहोचली आहे. तसेच आज 13 हजार 165 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 22 लाख 47 हजार 495 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत ३ हजाराच्या पल्ल्याआड रुग्णसंख्या

मुंबईत आज तब्बल 3 हजार 512 नवे करोनाबाधित सापडले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट आता 90 टक्क्यापर्यंत आला आहे. वाढता संसर्ग पाहता मुंबई महानगर पालिकेने देखील यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘रात्रीस खेळ चाले पर्व 3’ ही मालिका अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

यह दाग अच्छे नहीं : आरोप प्रत्यारोपांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा