in

OBC Reservation | ओबीसी एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली

रुपेश होले | बारामतीत २९ तारखेला होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाची पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. या मोर्चात सत्तेतील विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार होते. दरम्यान आता मोर्चाला परवानगी नाकारल्याने हा विषय चिघळण्याची चिन्हे आहेत.

ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यानं बारामतीत राज्यातील पहिला ओबीसी एल्गार मोर्चा होणार होता. २९ तारखेला बारामतीत ओबीसींचा पहिला एल्गार मोर्चा होणार असल्याची माहिती आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र बारामती शहर पोलीसांनी या मोर्चाची परवानगी नाकारली आहे. या मोर्चाला नाना पटोले, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, महादेव जानकर, राम शिंदे, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, इम्तियाज जलील, रुपाली चाकनकर या दिग्गज नेत्यांची उपस्थितीत असणार होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे या मोर्चाची परवानगी नाकारली आहे. यामुळे आता हा विषय चिघळण्याची चिन्हे आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात आयोजकांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांच्या काळात DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा; देवेंद्र यांची पहिली प्रतिक्रिया

उंबरमाळी रेल्वे ट्रकवर साचले पाणी; रेल्वे सेवा विस्कळीत