in

देव तारी त्याला कोण मारी… रेल्वेखालून वृद्धाला काढलं बाहेर!

‘देव तारी त्याला कोण मारी’, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकात आला. घरात झालेल्या किरकोळ वादातून कल्याण रेल्वेस्थानकात आत्महत्या करण्यास ट्रॅक वर आलेल्या एक वृद्धाचे प्राण मेल एक्स्प्रेसचे मोटर मॅन आणि रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले. हरिप्रसाद कर्ण असे या 86 वर्षीय  वृद्धाच नाव आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात एक वृद्ध इसम एक वाजण्याच्या सुमारास ट्रॅक वर आला .याच वेळी मुंबई वाराणसी एक्स्प्रेस सुरू झाली होती. हा इसम एक्स्प्रेस पासून खूपच जवळ होता मात्र मोटरमन रवी शंकर यांच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यामुळे या इसमाचे प्राण बचावले. विशेष म्हणजे पूर्णपणे गाडी खाली येऊनही या वृद्धाला साधे खरचटले देखील नव्हते.

रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांच्या मदतीने या वृद्ध इसमाला ट्रॅक मधून बाहेर काढण्यात आले. रेल्वे पोलिसांकडून कडून या वृद्ध इसमाची समजूत काढत त्याना धीर देत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज कल्याण रेल्वे स्थानकावर आला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs Sri Lanka Live Score, 1st ODI | श्रीलंकेने भारतासमोर ठेवलं 263 धावांचं लक्ष्य

देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा