in

omicron variant | लहान मुलांमधील संसर्ग वाढला

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोना होणाचं प्रमाण वाढलंय. दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. देशामध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत १६ हजार ५५ करोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २५ जणांचा करोना संसर्गाने मृत्यू झालाय. असं असतानाच नॅशनल इंन्स्टीट्यूट ऑफ कम्युनिकेबल डीसीज म्हणजेच एनआयसीडीच्या डॉक्टर वसीला जसत यांनी लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय.

“आता नव्या लाटेमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र त्यातही चिंतेची बाब म्हणजे पाच वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. पाच वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण हे ६० वर्षांवरील वयोगटाच्या तुलनेत कमी असलं तरी पूर्वीपेक्षा अधिक आहे. करोना संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण ६० वर्षांवरील लोकांमध्ये अधिक आहे. वयस्कर व्यक्तींनंतर करोना वेगाने पसरण्याचा वयोगट हा पाच वर्षांखालील आहे. पूर्वी लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचं प्रमाण कमी होतं. आता मात्र रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या वाढल्याचं दिसतंय,” असं डॉ. जसत म्हणालेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन; नवाब मलिक म्हणाले…

दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या – भीम आर्मी