राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू करण्यात आले असून अनेक स्थलांतरित मजुरांचे काम बंद झाले आहे. यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सजवळ उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लॉकडाउनच्या भीतीने परप्रातींयांनी गावची वाट धरली आहे.
मात्र मजुरांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईत हाताला काम नाही त्यामुळे आता गावीच थांबण्याचा या मजूरांचा निर्धार आहे. तर काहींनी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मुंबईत परतू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मजुरांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहेत. ट्रेन पण गच्च भरलेली दिसते आहे. आम्ही शहर सोडत आहोत कारण कोरोना वाढतो आहे असो एका प्रवाशाने सांगितले
Comments
Loading…