in ,

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही – संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. उलट या भेटीत शरद पवार यांनीच विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले असतील, असे राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

World Milk Day | जागतिक दूध दिनानिमित्त दुधाचं महत्त्व आणि फायदे

भारताच्या आक्षेपातनंतर WHO ने ‘त्या’ व्हेरियंटचे बदलले नाव