in

…अन्यथा महाराष्ट्रात फिरताना निलेश राणेंना विचार करून फिरावा लागेल

खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबात भेट घेतली. तर आज खासदार संभाजीराजे दुपारी 12 वाजता देवेंद्र फडवणीस, 1 वाजता बाळासाहेब थोरात तर 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करणार आहे. आणि सायंकाळी 5 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणा बाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

मात्र संभाजीराजेंना मराठा समाजाचा ठेका दिला नाही असं गुरुवारी नारायण राणे यांचे चिरंजिव माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या ट्विटवर आता मराठा समाज आक्रमक झालाय खासदार संभाजीराजे यांच्या विषयी टीका करतांना विचार करावा अन्यथा महाराष्ट्रात फिरताना निलेश राणे यांना विचार करून फिरावा लागेल असा इशारा मराठा समाजाचे नेते छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला डोमिनिका कोर्टाची स्थगिती

SSR Death Case | सुशांतच्या जवळच्या मित्राला NCBने केली अटक