in

‘आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय’ – मृण्मयी देशपांडे

छोट्या पडद्यावर नुकताच रसिकांच्या भेटीस आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवाती पासूनच पसंती दिली आहे. या प्रतिभावान लिटिल चॅम्प्सना मार्गदर्शन पंचरत्न त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे स्पर्धकांना जज करत असल्यामुळे आधी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. एकीकडे रसिकांची या कार्यक्रमाला पसंती मिळते तर दुसरीकडे सोशल मीडियावर नेटीझन्स मात्र कार्यक्रमाची खिल्ली उडवताना दिसतात आहेत.

आता सुत्रसंचालन करणारी मृण्मयी देशपांडेवरही नेटीझन्सने निशाणा साधला आहे. तिच्यावरही खास मीम्स बनवत ते व्हायरल केले जात आहेत. हे पाहून मृण्यमीने यावर आपले मत मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी मृण्मयीनं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ‘आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय’, असं म्हणत ट्रोल करणा-यांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर ट्रोलरर्सनी मृण्मयीवर मीम्स बनवून व्हायरल केले. हे मीम्स सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित

चित्रपटगृहातच होणार “83′ रिलीज