in ,

राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसी पैकी बीडला पुरेसे लस नाही; पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं असून बीड जिल्ह्याकडं लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पंकजा यांनी ट्वीट देखील केलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती टोपे यांना दिली आहे. ‘बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. परिस्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार ९८९ लोक आतापर्यंत बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुरेशी लस नसल्यानं लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या साऱ्याकडं आपण जातीनं लक्ष द्यावं व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं,’ अशी विनंती पंकजा यांनी केली आहे.

‘राज्याला मिळालेल्या लसीच्या दोन लाख डोसेसपैकी केवळ २० डोस बीड जिल्ह्याला मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करून द्यावेत,’ असंही पंकजा यांनी म्हटलं आहे. ‘बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,’ असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडे यांना सणसणीत टोला हाणला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CBIचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह कोरोना पॉझिटिव्ह