in

सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला

मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. असे असताना पण कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.

स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन सातत्याने केले जात होते. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला आहे. नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलाने सुटका केली आहे.

काही नागरिक लहान मुलांसह काल रविवारच्या दिवशी फिरण्यासाठी गेले होते. पण मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी वाढले, अन् या पाण्याचा वेग एवढा भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलाने या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलेही होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप

भिवंडीत पावसाने उडवली दाणादाण; अनेक भागात पाणी साचले