in

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणार राज्य सरकारचा निर्णय

राज्यात कोरोना रुग्णाचा उद्रेक होत असताना , ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्हास्तरावर पीएसए म्हणजेच ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणीला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीआहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केली.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर रुग्णांना बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने तो उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत लोकांना तातडीने दिलासा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली.

हवेतून ऑक्सिजन घेऊन पेशंटला पुरवणाऱ्या पोर्टेबल ऑक्सिजन कॉंसन्ट्रेटरच्या खरेदीला देखील तात्काळ मंजुरी देण्यात यावी. ही खरेदी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. या मागणीला तात्काळ मंजुरी देत तसा शासन आदेश काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मोदी नावाचा वापर करून नेतान्याहूंनी कोरोना पळवून लावला असंही भक्त मंडळी बोलू शकतात”

४५ वर्षांपेक्षा कमी असूनही देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला देण्यात आली लस ; सोशल मीडियावर चर्चांना उधाण