in

पंढरपूरचा निकाल रात्री ९ नंतरच येणार!

पंढरपूर पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होत असून कोरोना संकटामुळे मर्यादित १४ टेबलवरच ही मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास रात्र होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार असून प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली आहे.

मतमोजणीला येणाऱ्या प्रत्येकासाठी कोविड चाचणी सक्तीची असणार आहे. कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांनाही कोविड चाचणी करूनच मतमोजणी केंद्रात यावे लागणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs SRH:हैदराबादला पहिला धक्का; जॉनी बेअरस्टो ७ धावा करून बाद

हृदयद्रावक | दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता दीड वर्षीय चिमुरडा